घरफोडीत 4 लाख लंपास

पिंपरी – अजमेरा कॉलनी येथे बंद घराचे कुलप तोडून चार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडे नऊ ते बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली.

या प्रकरणी मदन गणेश कुलकर्णी (वय-63, रा. सागर सोसायटी, अजमेरा कॉलनी,पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलकर्णी यांचे घर बंद असताना अज्ञाताने घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील सोने व चांदीचे 3 लाख 92 हजार 100 रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. पिंपरी पोलीस तपास करत असून पोलिसांनी सीसीटिव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)