घरफोडीत सोन्याचे दागिने लंपास

पिंपरी – घरफोडी करत चोरट्याने ४९ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. २५) सकाळी दहाच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

मनीष मनोहर भुजबळ (वय ५०, बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष यांचे घर सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी दहा या वेळेत बंद होते. त्यावेळी चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील ४९ हजार ५०० रुपये किमतीचे ३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेवाळे तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)