घरफोडीत साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

पुणे- बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सोळा हजार रुपये रोख आणि सोन्याचांदीचे दागिने असा 3 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना 25 ते 28 जानेवारी या कालावधीत कर्वेनगर येथील शाहु गल्लीतील पारिजात चिन्मय कॉलनीत घडली. वारजे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कर्वेनगर येथील एका 68 वर्षीय वृध्दाने यासंदर्भात वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वृध्द काही कामानिनित्त कुटुबियांसह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोळा हजार रुपये रोख तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा 3 लाख 38 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस उपनिरीक्षक एस. एन. धावडे अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)