घरफोडीच्या प्रयत्नात असलेले चोरटे जेरबंद ; साथीदार पसार

पुणे – घराचा कडीकोयंडा उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन चोरट्यांना पाठलाग करून पकडले, तर त्यांचे अन्य तीन साथीदार पसार झाले आहेत. त्यांच्या विरोधात स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 29 जानेवारी रोजी मध्यरात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास सॅलसबरी पार्क येथील कोणार्क अभिषेक सोसायटीत घडली.

सन्नीसिंग पापासिंग दुधाणी (20, रा. बिराजदार नगर, रामटेकडी) आणि पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (19, रा. आनंदनगर, रामटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांच्या अन्य तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. डी. साबळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पथक रात्री गस्त घालत असताना सॅलसबरी पार्कमधील कोणार्क अभिषेक सोसायटीत चोरी होत आहे असा कॉल त्यांना नियंत्रण कक्षातून आला. त्यानुसार या पथकाने त्याठिकाणी जाऊन दुधाणी आणि टाक यांना अटक केली, तर त्यांचे अन्य तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक एस. जे. कदम अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)