घरच्या घरी उपचार ; मेथी 

चवीला अत्यंत कडू, परंतु आरोग्याच्या दृष्टीने हितावह असा मेथीचा गुणधर्म आहे. मधुमेहाला आटोक्‍यात आणायला मेथीचा बराच उपयोग होतो. मेथी रात्रभर पाण्यात भिजविल्यावर ते पाणी दिवसभर प्यावे. असे नित्यनेमाने महिनाभर केले तरी मधुमेहाने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना शरीरामध्ये आश्‍चर्यकारक बदल झाल्याचे दिसून येईल.

मेथी कडू असल्याने मधुमेहाच्या विकारात अत्यंत गुणकारी ठरली आहे. लघवीतून साखर जाण्याच्या विकारामध्ये वरीलप्रमाणे उपाय केला असता गुण आल्याचे आढळून आले आहे. आपल्या रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर करावयास हवा.

थंडीमध्ये बहुधा वातविकार उफाळून येतात. अशा वेळेस सांधे दुखणे, आमवात, अंग मोडून येणे अशासारखे विकार बळावतात. मेथीच्या सेवनाने उदाहरणार्थ मेथीची भाजी, मेथीयुक्‍त पाणी, मेथीचे लाडू व मेथीचे लोणचे याचा आहारामध्ये समावेश करावा.

मेथीचा लाडू दिवसातून एकतरी खावा. अंगदुखीवर अत्यंत गुणकारी असा मेथीचा लाडू बाळंतिणीस तर अवश्‍य द्यावा. त्यामुळे वातविकारांच्या त्रासापासूनही मुक्‍तता मिळते. मेथीपाकाच्या सेवनामुळे वातरोग, संधिवात, आमवात,

आम्लपित्त, बाळंतरोग व नेत्ररोग यावर नियंत्रण राखले जाते. शरीरसंगोपनासाठी सकाळ-संध्याकाळ चमचाभर मेथीपाक दुधाबरोबर घ्यावा. शरीरसंवर्धनासाठी मेथी तेलाचाही उपयोग केला जातो.

मेथीच्या कोवळ्या पानांच्या भाजीचाही आहारामध्ये अंतर्भाव असणे अत्यंतिक आवश्‍यक आहे.

मलावरोधासारखे विकार दूर राखले जातात. पोट साफ राहते आणि रक्‍तशुद्धीचेही कार्य त्यामुळे होते.

मेथी हे उत्तम दर्जाचे टॉनिक आहे. मेथीचे गुणधर्म वातहारक, वायुनाशक, वीर्यवर्धक, रक्‍तशुद्धीकारक व रसधातूपोषक असे आहेत.

रोजच्या आहारामध्ये मेथीचा वापर या ना त्या मार्गाने झालाच पाहिजे. मेथी घातलेल्या चपात्या, मेथीची भाजी, ठेपला,

मुठिया, लोणचे, लाडू या मार्गाने मेथी आपल्या पोटात जाणे अत्यंत गरजेचे आहे, कारण मेथी जरी चवीला कडू असली तरी तिचे कार्य शरीराच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असे आहे.

रोज सकाळी थोडी मेथी खाल्याने वायुविकार दूर होतो. मेथी व सुंठीचे चूर्ण गुळात मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास आमवात दूर होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)