घरच्या घरी उपचार ; काकडी 

काकडीचे बी लावून काकडीची लागवड केली जाते. काकडीच्या वेलांना एक वीतभर लांबीच्या तसेच हातभार लांबीच्या काकड्या लागतात. साधी, सातपत्ती, नारंगी, तरकाकडी असे काकडीचे अनेक प्रकार असतात. काकडीची कोशिंबीर, सांडगे, रायते बनवतात. तरकाकडी सोलून, त्याचे चार भाग करून त्यात मीठ, मसाला किंवा मिरपूड घालूनही खाल्ली जाते. जड आहार घेतल्यास शेवटी काकडी खावी किंवा काकडीची कोशिंबीर करून खावी. काकडी रुक्ष, तृषाहारक, मधुर असते. 

उष्णतेचा दाह होत असेल तर काकडीचे लहान लहान तुकडे करून त्यावर साखर घालून खावे.

दारूचा अंमल, नशा उतरवायची असल्यास काकडी खावी किंवा काकडी व कांद्याचा रस एकत्र करून प्यावा.

-Ads-

अपचनामुळे उलटी होत असेल तर काकडीचे बी मठ्ठ्यात वाटून प्यावयास द्यावे. लघवीला जळजळत असल्यास काकडीच्या रसात लिंबू पिळून त्यात थोडी साखर व जिरेपूड घालून प्यावी.

काकडीचे बी, साखर व जिरेपूड वाटून गरम पाण्याबरोबर घेतल्याने मूत्राघात दूर होतो. तसेच काकडीच्या बीमधील गर, ज्येष्ठमध, दारूहळद यांचे चूर्ण करून तांदळाच्या धुवणातून मुतखडा दूर होतो.

गुडघेदुखीचा त्रास होत असल्यास जून काकडीची जाडसर साल दिवसातून दोन-तीन वेळा गुडघ्यावर बांधावी. काकडी वाटून त्याचा लगदा चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा मुलायम, नितळ होते.

चेहरा तजेलदार दिसण्यासाठी काकडीचा रस काढून चेहऱ्यावर हळुवार चोळावा. काही वेळाने नुसत्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.

डोळेदुखी, डोळ्यांची आग होणे यावर काकडीच्या चकत्या कापून बंद डोळ्यांवर ठेवाव्यात व पंधरा-वीस मिनिटांनंतर डोळे थंड पाण्याने धुवावेत. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आल्यास, रात्री झोपताना काकडीचा रस तेथे हळुवारपणे चोळावा.

अंगात उष्णतेचे प्रमाण वाढल्यास काकडीच्या रसात ग्लुकोज पावडर घालून प्यावे. अंगाची आग होत असल्यास काकडी चिरून साखरेबरोबर खावी. काकडी पचावयास जड असते. काकडी नुसती न खाता मीठ किंवा मिरपूड लावून खावी. काकडी प्रमाणात खावी.

काकडीच्या अतिरेकी सेवनामुळे किंवा त्यावर लगेचच पाणी प्यायल्यास शौचास होते. काकडी भरपूर प्रमाणात खाऊ नये तसेच पावसाळ्यातही काकडी जपूनच खावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)