घरगुती वादातून विवाहितेची आंबेगाव पठार येथे आत्महत्या

पुणे- घरगुती वादातून विवाहित महिलेने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कात्रज परिसरातील आंबेगाव पठार येथे रविवारी दुपारी ही घटना घडली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. आकांक्षा योगेश पाटील (21, रा. आंबेगाव पठार), असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा हिचे 3 वर्षापूर्वी योगेशसोबत लग्न झाले. त्यांना एक अपत्य आहे.

मयत आकांक्षा हिचा पती योगेश हा रिक्षाचालक असून आकांक्षा गृहिणी होती. दरम्यान, त्यांच्यात घरगुती वाद होते. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिने आत्महत्या केली. ही माहिती समजताच पोलीस भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप यादव व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घरगुती वादातून आकांक्षा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)