घरगुती वादातून पत्नीचा खून

आत्महत्या केल्याचा बनाव उघड
खंडाळा, दि. 12 (प्रतिनिधी) – खंडाळा तालुक्‍यातील कण्हेरी येथील सराईत गुन्हेगार खालिद अहमद शेख (वय 36) याने घरगुती वादातुन पत्नी सना उर्फ मनिषा खालिद शेख हिचा मारहाण करून खुन केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव करित त्याने पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मृत्युचे खरे कारण काही वेळातच उघड करित संशयित खालिद याला ताब्यात घेतले.
खालिद शेख हा काही वर्षापुर्वी आई – वडिलांसमवेत पुणे येथील पिंपळे गुरव परिसरात रहात होता. या दरम्यान शालेय शिक्षण घेत असताना सना उर्फ मनिषा बरोबर त्याचे प्रेम जमले. यानंतर दोघांच्याहि घरच्यांचा विरोध पत्करून खालिद व सना उर्फ मनिषाने पळुन जाउन प्रेमविवाह करुन कण्हेरी ( ता. खंडाळा ) या ठिकाणी आपला संसार थाटला. त्यांना दोन मुल आहेत. खालिद हा याच काळात व्यसनाच्या आहारी गेला होता व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला होता. घरफोडी, चोरी मारामारी, लुटमार अशा प्रकारच्या गुन्ह्यात तो सातारा व खंडाळा पोलीसांना सापडला होता. विविध प्रकारचे नउ गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्याच्या तडिपारीचा प्रस्तावहि पोलीसांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. असे असताना त्याचे आणि पत्नीचेहि घरगुती कारणावरून भांडण होण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली होती. रोजच्या भांडणातुन खालिद याने पत्नीस बेदम मारहाण करित तिचे डोके जमिनीवर आदळले यामध्येच तिचा मृत्यु झाला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या नंतर पहाटेच्या सुमारास गावातील काही व्यक्तींना पत्नीचा मृत्यु झाला असल्याची कल्पना खालिद शेख याने दिली व ती आजारी असल्याने आत्महत्या केल्याचाहि बनाव केला. आजारपण, आत्महत्या कि खुन या तिन्ही गोष्टीचा विचार करून खंडाळा पोलीसांनी मृतदेह खंडाळा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. या दरम्यान डोक्‍याला झालेल्या गंभीर मारहाणीमुळे मृत्यु झाल्याचा अहवाल मिळाल्यानंतर पोलीसांना मृत्युचे गुढ उलगडले. तद्दनंतर सना उर्फ मनिषा शेख हिच्या खुनाची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. सदर घटनेचा तपास स.पो. नि. हणमंत गायकवाड हे करित आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)