घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात महिला जखमी

पिंपरी – घरगुती गॅस नादुरुस्त असल्याचे सांगूनही दुरुस्ती न केल्याने स्फोट झाला व त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. याप्रकऱणी संबंधित गॅस एजन्सी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

सुरेश भागुजी हिंगणे (वय-52 रा. मोशी) यांनी फिर्याद दिली असून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नितीन नागरगोजे (वय-28) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रंजना यांनी गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर खराब असल्याने गॅस गळती होत असल्याची तक्रार वैष्णवी गॅस एजन्सी यांच्याकडे केली. यावेळी एजन्सीकडून नितीन हा घरी आला मात्र त्याने दुरुस्ती न करता रंजना यांना गॅस चालु कऱण्यास सांगितला त्यातून हा स्फोट झाला असल्याचा आरोप करण्यात आला, त्यानुसार नितीवर गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)