घरगुती गणेश विसर्जनासाठी मुर्ती विक्रेत्यांची घेणार मदत

महापालिका करणार अमोनियम बायकार्बोनेटचे वितरण

पुणे – महापालिकेकडून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सुमारे 100 टन अमोनियम बायकार्बोनेट खरेदी करण्यात आले आहे. याचे नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे. मात्र, हे बायकार्बोनेट वाटपासाठी कमी कालावधी असल्याने शहरातील गणेशमुर्ती विक्रेते आणि गणेश मंडळांची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरवर्षी अमोनियम कार्बोनेटचे क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून वाटप केले जाते. मात्र, त्यास पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने दरवर्षी 20 ते 30 टन शिल्लक राहते. ही बाब लक्षात घेऊन नागरिक मुर्ती घेण्यासाठी आले असतानाच; त्यांना घरगुती विसर्जनासाठी जनजागृती करून मुर्ती सोबतच हे बायकार्बोनेट मोफत देण्यात येणार असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार, वाढते नदी प्रदूषण रोखण्यासाठी 2016 पासून महापालिकेकडून नागरिकांनी घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन घरीच करावे, यासाठी अमोनियम बायकार्बोनेट मोफत दिले जाते. त्याचे वाटप क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्यात येते. पहिल्या वर्षी 12 हजार नागरिकांनी घरगुती मुर्ती विसर्जन केले. मागील वर्षी हा आकडा 42 हजारांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांकडून पर्यावरणपूरक गणेशमुर्ती विसर्जनावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना अमोनियम बायकार्बोनेट मिळावे या उद्देशाने या वर्षीपासून ते मुर्ती विक्रेत्यांना दिले जाणार असून मुर्ती देतानाच; त्यांनी ते नागरिकांना द्यावे, अशा सूचना केल्या जाणार आहेत. त्यासाठी मुर्ती विक्रेत्यांच्या स्टॉलच्या परिसरात महापालिकेकडून याची माहिती देणारे फलकही लावले जाणार आहेत. मुर्ती विक्रेत्यांसोबतच गणेश मंडळांनाही अमोनियम बायकार्बोनेट दिले जाणार आहे. त्यांनीही मंडळाच्या माध्यमातून याबाबत जगजागृती करून मुर्ती विसर्जन घरगुती पध्दतीने अथवा हौदातच करावे, असे आवाहन मंडळाना केले जाणार असल्याचे उपायुक्त मोळक यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)