घरकुल वंचितांना निंबळकमध्ये जमीन

नगर: घरकुल वंचितांच्या घरांचे स्वप्न साकार होण्यासाठी राज्य सरकारने लॅन्ड पूलिंग योजनेचा स्विकार केला आहे. शहरालगत असलेल्या निंबळक व इसळक शिवारातील खडकाळ पड जमीनी या योजनेसाठी मिळण्याकरीता मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने निंबळक ग्रामपंचायत येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. उपस्थित शेतकऱ्यांनी या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात 50 एकर खडकाळ पडिक जमीन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. हायब्रीड लॅन्ड पूलिंगसाठी शेतकरी खडकाळ जमिनी देण्यास तयार होत असताना घरकुल वंचितांचा प्रश्‍न सुटण्याची चिन्हे दिसत आहे.

निंबळकचे माजी सरपंच विलास लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सरपंच साधना लामखडे, उपसरपंच घनश्‍याम म्हस्के, बाबासाहेब पगारे, घरकुल वंचित आंदोलनाचे नेतृत्व करणारे ऍड.कारभारी गवळी, कमल कदम, रुपाली होळकर, ज्योती कोतकर, अनिल भाकरे, विठ्ठल सुरम, शाहीर कान्हू सुंबे, आश्‍विनी शेळके आदिंसह घरकुल वंचित व इसळक, निंबळकचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास लामखडे म्हणाले की, ही योजना शेतकरी हिताची आहे. खडकाळ जमीनीच्या मोबदल्यात विकसीत जमीनीचा काही भाग शेतकऱ्यांना मिळणार आहे. घरकुल वंचितांचा प्रश्‍न मार्गी लागून, शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इसळक व निंबळक भागात मोठ्या प्रमाणात खडकाळ पड जमीन असून, येथे घरकुल वंचितांचा मोठा प्रकल्प उभा राहू शकतो. यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा करण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)