घरकुल योजना पुर्ण करणे हीच आषाढवारी सुनिता गडाख

यशवंतनगर येथे आढावा बैठक

नेवासाफाटा – नेवासा तालुक्‍यात अनेकांना राहायला घरच नाही. हाच मुलभूत प्रश्न डोळ्यासमोर ठेवून वर्षभरात सर्वच गरजूंना पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. ही योजना पंढरीची आषाढवारी समजूनच पूर्ण केली जाईल. असा दृढ विश्वास पंचायत समितीच्या सभापती सुनिता गडाख यांनी व्यक्त केला.
सोनई जिल्हा परिषद गटात मंजूर झालेल्या व काम सुरू असलेल्या घरकुलाबाबत यशवंतनगर (वंजारवाडी) येथे आयोजित आढावा बैठकीत गडाख बोलत होत्या. अध्यक्षस्थानी वंजारवाडीच्या सरपंच सुदामती दराडे होत्या. गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, अंबादास राऊत, नानासाहेब दराडे, महादेव दराडे, सुनंदा दराडे, सुनिल वाघ, इंजिनिअर ऋषिकेश निमसे उपस्थित होते.
तालुक्‍यात पंतप्रधान आवास योजनेतून 1084 तर रमाईमधून 675 घरकुलांना यावर्षी मंजूरी देण्यात आली. माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्‍यात जास्तीत जास्त घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे त्यांनी सांगितले.
यशवंतनगर व वंजारवाडी ग्रामस्थ व लाभार्थ्यांच्या वतीने समाजाच्या प्रश्नाला अग्रक्रम द्या अशी सुचना माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.त्यानंतर पंचायत समितीच्या वतीने घरकुल योजनेबाबत विशेष नियोजन करत तालुक्‍यातील सर्वच गावात योजनेचे काम सुरू केले आहे. गडाख म्हणाल्या हे काम करतांना कुणाही लाभार्थ्यांला पहिल्यासारख्या चकरा न मारता वेळोवेळी निधी उपलब्ध केला जाईल.
गटविकास अधिकारी मुंढे युवा कार्यकर्ते सुभाष राख यांचे भाषणे झाले. सभापती व उपसभापती यांनी यशवंतनगर येथे काम सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी केली. 14 व्या वित्त आयोगातील सहा लाखाच्या बंदीस्त गटार कामांची पाहणी केली.
सन-2017-18 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतून 121 घरकुल मंजूर झाले पैकी 59 घरकुल वंजारवाडी गावात आहे. रमाई आवास योजनेतून 12 घरकुल मंजूर झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)