घरकुलमधील अपंग रहिवाशांचा मोर्चा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिखली येथील घरकुल प्रकल्पातील अपंग रहिवाशांनी महापालिकेवर मोर्चा काढला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. महापालिका भवनावर मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ज्या अपंगांना घरकुलमध्ये घरे मिळाली आहेत. त्यांना घराचे हप्ते भरणे शक्‍य नसल्याने बॅंकेकडून कर्ज माफी मिळावी यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. ज्या अपंगांना घरे मिळाली नाहीत त्यांच्यासाठी महापालिकेने नव्याने घरकुल योजना तयार करावी. मुंबई महापालिकेच्या नवीन धोरणा प्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुद्धा अपंगाच्या मिळकतींना कर माफी द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

भर उन्हात काढलेल्या या मोर्चात अपंग रहिवासी व त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. अपंग महिला बचत गटाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात राजू हिरवे, विनोद नलावडे, अशोक कुंभार, हरेश्‍वर गाडेकर, बाळासाहेब मुळे, राजू अमले, तात्या महापुरे, महंमद शफी पटेल, दिव्या सापरीया, हनुमंत सोडमिसे, हजारे काका, प्रकाश तोडकर, नागेश काळे आदींनी सहभाग घेतला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)