घरकुलच्या जुन्या थांब्यावर बस थांबवा

चिखली – घरकुल परिसरातील जुन्या थांब्यावर बस थांबवण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमान विकास मंचच्या वतीने स्वारगेट वाहतूक व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याठिकाणी पीएमपीएमएलच्या बस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. घरकुल मधील मुख्य बस थांबा ते जुना बस थांबा याच्यात मोठे अंतर असून त्यामुळे वृध्द, लहान मुले, अपंग, अंध यांना हे अंतर चालणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे जुन्या बस स्थानकांवर बस थांबवाव्यात.

-Ads-

घरकुल मधील लोकसंख्या 30 हजार असून त्यामुळे शाळा, कॉलेज, कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी घरकुल ते पिंपरीगाव बस फेऱ्या वाढवण्यात याव्यात, जुना पंचिंग पास परत सुरु करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर स्वाभिमान विकास मंचाचे अध्यक्ष शिवदास चिलवंत, घरकुल अध्यक्ष कुमार भालेराव, वर्षा पाटील, मिलिंद कांबळे, अलका चिलवंत, संतोष राक्षे, वैशाली लांडे, सिमा जोशी, कल्याणी नाडकर, गणेश पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)