घनकचरा व्यवस्थापन ( भाग – 3 ) पालिकेने बनविला स्वनिर्मित हरितब्रॅन्ड

ओल्या कचऱ्यापासून सेंद्रीय खतनिर्मितीचा उपक्रम, शासनाची मान्यता

सुनिता शिंदे

कराड – स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत घनकचरा व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे. कोणत्याही शहराची कचरा ही जटिल समस्या असल्याने यावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात याची शासनाकडून पाहणी केली जाते. कराड नगरपालिकेनेही त्यावर मात करण्याचा जणू निश्‍चयच केला आहे. त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत त्यामध्ये नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती बरोबरच खतनिर्मिती करत पालिकेने स्वत:चा असा ब्रॅंन्ड तयार केला आहे.

या सेंद्रिय खताला शासनाचीही नुकतीच मान्यता मिळाली आहे. शहरातून संकलित झालेला कचरा बारा डबरी परिसरात एकत्र केला जातो. त्यातील ओला व सुका कचरा याचे विलगीकरण करून कुजलेल्या ओल्या कचऱ्यावर मशिनद्वारे प्रक्रिया करून सेंद्रिय खत बनविले जात आहे. पालिकेचा 11 टन क्षमतेचा हा प्रकल्प आहे. तयार झालेले सेंद्रिय खत शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते.

शासनानेही त्याला मान्यता दिल्याने पालिकेने हे खत हरितब्रॅन्ड या नावाने विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. शहरात ठिकठिकाणी व चौकामध्ये हरितब्रॅन्डचे बॅनर लावण्यात आले आहेत. सध्या 2 किलोने या खताची विक्री केली जात आहे. हे खत उत्तम दर्जाचे व स्वस्त असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.

शहरातील अनेक कुटुंबे परसबागेचा उपक्रम राबवित आहेत. त्या कुटुंबानाही पालिकेचे हरितब्रॅन्ड वापरासाठी देण्यात आले आहे. तसेच शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेल्या झाडांनाही हे खत दिले जात आहे. शहरातील जवळजवळ शंभर कुटुंबेही पालिकेबरोबरच घरी खतनिर्मिती करत आहेत. घनकचऱ्यावर मात करत पालिकेकडून जनजागृती करण्याचा अनोखा प्रयत्न केला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)