घटाच्या मातीतून मिळाला रोजगार!

पिंपरी – दहा रूपयांना घटाची माती घ्या…, दहा रूपयाला घटाची माती… असे ओरडणारा पंचवीस वर्षीय युवक पिंपरी बाजारपेठेत सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. कला शाखेचा पदवीधर असूनही नोकरी मिळत नसल्याने घटाच्या मातीच्या विक्रीतून चार पैसे कमवता येत असल्याचे या युवकाने सांगितले.
अनिकेत खराटे असे या युवकाचे नाव आहे. भारतातील सणोत्सवामुळे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. गणेशोत्सव, दसरा, दिवाळीचा सण म्हणजे “सिझनेबल’ विक्रेत्यांसाठी पर्वणीच असते. अनिकेत हा कला शाखेचा पदवीधर आहे. गवंडी काम करताना तो “पार्ट टाईम’ तो नवरात्रोत्सवात घटाची माती विकण्याचे काम तो करतो. मूळचा संगमनेर मधील अकोलेचा असलेला अनिकेत खराटे सध्या मावळ परिसरातील बेगडेवाडी येथे गेल्या पाच वर्षापासून राहत आहे.
बाजारात नवरात्रोत्सवासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या घटस्थापनेसाठी लागणाऱ्या घटाच्या मातीची आवक बाजारात झाली आहे. मावळ परिसरातील आजूबाजूच्या खेड्यामधून माती घेऊन विक्रेते दोन दिवसापूर्वीच बाजारात दाखल झाले आहेत. घटाची माती शेतातली असल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. यात ही दोन प्रकार आहेत. काही ठिकाणी शेतातली माती आहे तर काही ठिकाणी खडकाळ मातीचा भूगा करून बाजारात विकला जात आहे. मात्र, त्यात लावलेल्या दाण्यांना चांगली वाढ नसल्याची माहिती खराटे यांनी दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)