घटस्फोट मिळवण्यासाठी पत्नीच्या शरिरात सोडले “एचआयव्ही’चे विषाणू

डॉक्‍टर पतीचे कृत्य : जागतिक एडस्‌ दिनाच्या पुर्वसंध्येला प्रकार उघड

पिंपरी – घटस्फोट मिळवण्यासाठी डॉक्‍टर पतीने पत्नीच्या शरिरात “एचआयव्ही’चे विषाणू सोडले. ही धक्‍कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात जागतिक एडस्‌ दिनाच्या पुुर्वसंध्येला शुक्रवारी (दि. 30) उघडकीस आली.

-Ads-

याबाबत 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी बीएचएमएस डॉक्‍टर असलेल्या पतीसह सासू आणि सासऱ्याच्या (सर्व रा. पडवळनगर, थेरगाव) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह मे 2015 मध्ये झाला. लग्नाच्या काही वर्षानंतर सासरच्या मंडळींनी आपआपसात संगनमत करून व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. त्यापैकी काही पैसे प्राप्तही करून घेतले. मात्र त्यांची मागणी वाढत गेल्याने विवाहितेने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. ही बाब घराबाहेर पडू नये यासाठी तिचा पती मारहाण केल्यानंतर होणाऱ्या दुखापतीवर घरच्या घरीच उपचार करत असे.

आपण वारंवार आजारी पडत असल्यामुळे पीडितेला संशय आला. तिने माहेरच्या नातेवाईकांच्या मदतीने बाहेरून स्वतःची तपासणी केली असता. तिला “एचआयव्ही’ची लागण झाल्याचे उघड झाले. हा प्रकार सहा महिन्यांपूर्वीच उघडकीस आला होता. मात्र दोन्ही कुटुंबांनी यातून चर्चा करुन मार्ग काढण्याचे ठरवले. त्यासाठी अनेक चर्चा झाल्या. दरम्यान पतीचीही “एचआयव्ही’ची तपासणी करण्यात आली. मात्र ती “निगेटीव्ह’ आली. त्यामुळे पीडितेचा संशय बळावला. अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
5 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)