घटस्फोटितांच्या मुलांसाठी आज संवाद कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – घटस्फोट झालेल्या आणि घटस्फोटाचा दावा दाखल करण्यात आलेल्या पती-पत्नीच्या मुलांसाठी 5 जानेवारी रोजी “आल्हाद दिन – प्रेमाचा एक घास’ या संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन आणि अनाम प्रेम संस्थेने पुढाकार घेतला आहे.

‘शनिवारी (दि. 5) सायंकाळी 6 वाजता शिवाजीनगर येथील कौटुंबीक न्यायालयामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहीते-ढेरे, न्यायमूर्ती शालिनी जोशी-फळसणकर उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमान प्रेम संस्थेचे अमर काळे, भाविका काळे, अॅड. नीलेश फरतडे यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अॅड. कवडे म्हणाले, “घटस्फोट झालेले किंवा दावा दाखल असणाऱ्या पती-पत्नीच्या मुलांची फरफट होते. त्यांना मायेचा ओलावा मिळावा, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांना दुरावलेल्या आई-वडिलांच्या मायेचा ओलावा पुन्हा मिळण्यास मदत होणार आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)