घटस्फोटासाठी विवाहितेचा छळ

पिंपरी – माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेने पैसे आणण्यासाठी नकार दिल्याने तिच्याकडे घटस्फोट मागत छळ केला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली.

या प्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती असीम अन्वर शेख (वय-28) आणि सासू सायरा अन्वर शेख (वय-45) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचा आरोपी असीम याच्यासोबत जुलै 2017 मध्ये विवाह झाला.

-Ads-

विवाहानंतर सासरच्या मंडळींनी फिर्यादी महिलेच्या माहेरच्या लोकांनी लग्नात काहीही दिले नाही. त्यामुळे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेचा शारिरिक व मानसिक छळ केला. सासूने मतू माझ्या मुलाला घटस्फोट दे, मी त्याचे दुसरे लग्न लावणार आहे, अशी धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)