घटस्थापनेनिमित्त बटाटा, रताळी, भुईमूग शेंगांची आवक वाढली

 

पिंपरी – पितृ पंधरवडा संपत आला असून, दोन दिवसांवर आलेल्या घटस्थापनेसाठी मोशीतील नागेश्‍वर महाराज उपबाजारात बटाटा, रताळी व भुईमूग शेंगांची मोठी आवक झाली आहे. याशिवाय कोथिंबीरदेखील वाधारली असून, गडडीचा 20 रुपयांवर पोचला आहे. फळभाज्यांची एकूण आवक 987 क्विंटल झाली असून, पालेभाज्यांची आवक 15 हजार 500 गडड्या एवढी झाली आहे. फळभाज्यांची आवक 335 क्विंटलने घटली आहे, तर पालेभाज्यांची आवक चार हजार 460 गडड्यांनी घटली आहे.

बटाट्याची 231 क्विंटल आवक झाली असून, गेल्या आठवड्याच्या तुलनेत 153 क्विंटलची वाढ झाली आहे; तर भावात 50 रुपयांची वाढ झाली. कांद्याची आवक 86 क्विंटलने घटून भाव 150 रुपयांनी वधारले. भेंडीची आवक 12 क्विंटलने घटून भावात 500 रुपयांची वाढ झाली. गवारीची आवक तीन क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी घटले. तसेच टोमॅटोची नऊ क्विंटल आवक वाढून, भाव मात्र 200 रुपयांनी वधारले. मटारची आवक आठ क्विंटलने घटूनही भाव 1000 रुपयांनी वधारले. घेवड्याची आवक चार क्विंटलने घटून भाव250 रुपयांनी घसरले. दोडक्‍याची आवक सहा क्विंटलने घटून, भाव 7500 रुपयांनी घटले. लसणाची आवक सात क्विंटलने घटून, भावदेखील 200 रुपयांनी घटले. आल्याची आवक 11 क्विंटलने वाढून, भाव मात्र स्थिर राहिले. मिरचीची आवक सहा क्विंटलने वाढून, भाव स्थिर राहिले.
दुधी भोपळ्याची आवक दोन क्विंटलने घटून, भाव 200 रुपयांनी वधारले. कारल्याची आवक तीन क्विंटलने घटून, सलग दुसऱ्या आठवड्यात भाव स्थिर राहिले. गाजराची आवक पाच किंटलने घटून, भाव मात्र 350 रुपयांनी घसरले. फ्लॉवरची आवक 32 क्विंटलने वाढून भाव 150 रुपयांनी वधारले. कोबीची आवक 36 क्विंटलने वाढून भावात किरकोळ 50 रुपयांची घट झाली. वांग्याची आवक तीन क्विंटलने वाढूनही भाव मात्र 50 रुपयांनी वाढले. लिंबाची आवक आठ क्विंटलने घटून, भावात 500 रुपयांची वाढ झाली. मका कणीसची नऊ क्विंटल आवक वाढून, भाव मात्र 100 रुपयांनी वधारले.

शेवग्याची आवक दोन क्विंटलने घटून, भावात 250 रुपयांची वाढ झाली.ढोबळी मिरचीची आवक 10 क्विंटलने वाढून, भाव 150 रुपयांनी घसरले. डांगरची आवक एक क्विंटलने घटून, भावात 100 रुपयांची घट झाली. तोंडल्यांची आवक एक क्विंटलने घटून, भाव 500 रुपयांनी घसरले. बीटची तीन क्विंटल आवक वाढून, भावात 500 रुपयांची वाढ झाली. पावट्याची एक क्विंटल आवक वाढून, भाव 500 रुपयांनी घटले. याशिवाय चवळीची एक क्विंटल आवक घटून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. घोसावळ्याची आवक स्थिर राहून, भावात 250 रुपयांची वाढ झाली. भुईमुग शेंगांची आवक दोन क्विंटलने वाढून, भाव 750 रुपयांनी वधारले. तसेच पापडीची एक क्विंटल आवक वाढून, भाव स्थिर राहिले. शेवग्याची दोन क्विंटल आवक घटून, भणाव 250 रुपयांनी वधारले. तर वालवरची आवक दोन क्विंटलने घटूनही, भाव 1250 रुपयांनी वधारले.

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सर्वाधिक सहा हजार गड्ड्यांची आवक झाली. तर मेथीची तीन हजार 350 गड्ड्या आवक झाली आहे. याशिवाय शेपूची 750 गड्ड्या, मुळे 340 गड्ड्या, पुदीना एक हजार 150 गडड्या, पालक दोन हजार 360 गड्ड्या, तर कांदापातीच्या 850 गडड्‌यांची आवक झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)