घटस्थापनेचा मुहूर्त मध्यान्हापर्यंत

पुणे – शारदीय नवरात्रोत्सवाला बुधवारपासून सुरूवात होत आहे. त्यानिमित्ताने घराघरांमध्ये घटस्थापना करण्यात येते. हे घट बसविण्यासाठी साधारणत: मध्यान्हपर्यंतचा मुहूर्त असल्याचे गुरुजी तेजस सप्तर्षी यांनी सांगितले. प्रतिपदा अश्‍विन शुक्‍ल ही सकाळी 7 वाजून 26 मिनिटांपर्यत आहे. त्यामुळे ऐवढ्या सकाळी घट बसविणे शक्‍य नसल्याने मध्यान्हापर्यंत तरी बसवावे.

नवरात्रोत्सवात अनेक घरांमध्ये तर नऊ दिवस उपवास केले जातात. घटस्थापनेबरोबर नऊ दिवसाच्या काळात कुमारी पूजन, कुंक-मार्चन, सुवासिनी पूजन, सरस्वती पूजन, आयुध पूजन असे धार्मिक कार्यक्रम केले जातात. या काळात सप्तशतीचे पठणही करावे. याशिवाय नंदादीप आणि माला बंधनसुद्धा या काळात महतत्त्वाचे समजले जाते, असेही तेजस सप्तर्षी यांनी सांगितले.

-Ads-

नवरात्रौत्सवाची सांगता दसऱ्यादिवशी होते. त्यादिवशी दुपारी 2.20 ते 3.07 पर्यंत मुहूर्त आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)