घटनाचक्र 2017 समाजकारण: सांगलीतील क्रूरकर्मा…

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील म्हैसाळ येथील डॉ. बाबासाहेब खिरापुरे हा आपल्या रुग्णालयाच्या तळघरात गर्भपात करत असल्याची बाब उघड झाली. त्याला अन्य 5 डॉक्‍टराची साथही लाभत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढली . या रुग्णालयात 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीतील गर्भाची रुग्णालयाच्या शौचालयातच विल्हेवाट लावली जात होती. त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून ऍसिडचाही वापर केला जात होता . या प्रकरणात कर्नाटकमधील एका डॉक्‍टरला अटक झाल्याने या प्रकरणाचे आंतरराज्य कनेक्‍शन उघड झाले. या प्रकरणातील सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून लवकरच त्यांना शिक्षा सुनावली जाईल .पैशाच्या अमिषापायी स्त्रीभ्रूण हत्येचे पाप करणाऱ्या अशा नराधमांना खर तर फासावरच लटकावले पाहिजे. तरच असे पातक करणाऱ्यांना जरब बसेल .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)