घटनाचक्र 2017 समाजकारण: शेतकरी आत्महत्या…

सातत्याने शेतीचे होणारे नुकसान आणि शेतमालाला न मिळणारा हमीभाव यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी एकीकडे आत्महत्येचे पाऊल उचलत असतात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने कंटाळून सर्वोच्च न्यायालयाकडे इच्छमरणाची परवानगी मागितल्याने बळीराजाच्या अतीव दुःखाची कहाणी कोणत्या थराला पोहचली आहे हे नव्याने जगासमोर आले . अर्थात त्यानंतर शेतकऱ्यांच्या याच दुःखाचा उद्रेक झाला . शेतकरी संघटनांनी सरकारशी कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव मिळण्याविषयी केलेली चर्चा निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी प्रथमच संपाचे हत्यार उपसले . महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या संपाला हिंसेचे गालबोट लागले . येवल्यात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जाळपोळ केली . तर साताऱ्याजवळ रस्त्यावर दुधाचे टॅंकर उलटवले गेले . नाशिक ,नगर ,अकोला ,पुणे ,सांगली ,सातारा अशा सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले . शेतकऱ्यांच्या या संपामुळे भाजीपाल्याची आवक थांबल्याने भाज्यांचे दर भडकले . दरम्यान शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात येवल्यातील एका शेतकऱ्याला प्राण गमवावे लागल्याने शेतकरी संघटनानी महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली . तर मध्य प्रदेशातील आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला . अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निकषांवर सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)