घटनाचक्र 2017 समाजकारण: रामरहिमचे कारनामे…

श्रद्धाळू लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना उल्लू बनविणाऱ्या महाभागांची आपल्या देशात अजिबात कमतरता नाही. दुनिया झुकती है ,लेकिन झुकानेवाला चाहिये असं म्हणतात आणि समाजातील काही दांभिक ढोंगी लोक स्वतःला देवाचे अवतार असल्याचे सांगत सहज गंडवतात आणि प्रसंगी अशा दांभिकांचा खरा चेहरा देखील समाजसमोर उघड होतो . हरियाणातील डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमित रामरहिमसिंग हा देखील असाच ढोंगी साधू . साधूचा मुखवटा घालून अनेक वर्ष लोकांना आपले भक्त बनवून नादी लावणाऱ्या या ढोंगी बाबाने 2 साध्वीचे लैंगिक शोषण केल्याने त्याचा असली चेहरा जगासमोर आला आणि खळबळ माजली . या साध्वीच्या जबाबावरूनचं गुरुमितला अटक झाली. परंतु श्रद्धेच्या डोळ्यावर अंधश्रद्धेचे झापड बांधून संमोहित झालेल्या त्याच्या तथाकथित अनुयायांनी उत्तर भारतात प्रचंड हिसाचार माजवला . यात 36 जण जखमी झाले तर 250 जण जखमी झाले . या स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरूंची कुकर्मे एकापाठोपाठ उघड होत असतानाच अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशातील ढोंगी बाबांची एक यादीच जाहीर केली . या यादीमध्ये गुरुमित रामरहिमसिंग ,आसाराम ,नारायण साई ,रामपाल राधे मा ,सच्चीदानंद ,ओमबाबा ,निर्मलबाबा ,स्वामी असिमानंद ,ओम नमः शिवाय बाबा ,आचार्य कुष्मानी ,बृहस्पतीगिरी ,मल्यायन सिंह अशा 14 ढोंगीची नावे होती . समाजातील अशा ढोंगीच्या नदी लागणाऱ्या आणि आत्मविश्वास गंमावलेल्या श्रद्धाळू लोकांकडे पाहिलं तर श्रद्धेच्या नावानं चांगभलं असच खेदानं म्हणावसं वाटत .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)