घटनाचक्र 2017 समाजकारण: मंजुळा शेट्ये प्रकरणाचे गूढ…

मुंबईतील भायखळ्याच्या तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेटेंच्या संशयास्पद हत्येच्या प्रकरणामुळे कारागृहांची सुरक्षितता हा मुद्दा ऐरणीवर आला. या कारागृहातील 291 कैद्यांपैकी 60 कैद्यांनी आपल्या जबाबात मंजुळाला सहा महिला तुरुंग अधिकाऱ्यांनीच अमानुष मारहाण केल्याचे सांगितले . त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवरील पकड घट्ट झाली . हे प्रकरण सध्या न्यायालयीन प्रविष्ट आहे . कायद्याचे रक्षकच कधीकधी कायद्याचे भक्षक असतात याची साक्ष देणारे आणखी एक प्रकरण सांगलीमध्ये घडले. अनिकेत कोथळे याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात सांगली पोलिसांचा क्रूर चेहरा संपूर्ण राज्याने पाहिला . तर लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्‍यातील राज्य गुप्तचर खात्यातील निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची एक घटना उघड झाल्याने सर्वसामान्यांच्या मनात कायद्याविषयी साशंकता निर्माण झाली . मात्र हि घटना ताजी असतानाच पुण्याच्या येरवडा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने अपहरणाच्या गुन्ह्याबाबत शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याची दुसरी घटना घडली आणि एकच खळबळ उडाली . एकूणच कायद्याच्या राज्यात जिथे गुन्हेगारच शिक्षा भोगत असताना कायदा हातात घेतात आणि कायद्याचे रक्षकच मनमानी करून आपला धाक निर्माण करू पाहतात तेंव्हा मोठा अचंबा वाटतो .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)