घटनाचक्र 2017 समाजकारण: एसी बेस्ट झाली वेस्ट…

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक महत्वाचे साधन अर्थात बेस्ट. परंतु वाढत्या प्रवासीभाड्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांनी बेस्टकडे पाठ फिरवल्याने बेस्ट हि संस्था दिवसेंदिवस तोट्यात जात आहे . यंदा तर तोट्याची किमान पातळी ओलांडल्याने कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन देणेही अवघड ठरलेल्या बेस्ट प्रशासनाने अखेरीस पांढरा हत्ती ठरलेल्या एसी बसेसच्या सर्व सेवा सेवेतून बाद केल्या . त्यामुळे बेस्ट उपक्रमाची किमान 200 कोटींची बचत होणार आहे . त्याचवेळी बेस्ट संस्थेला वाचविण्यासाठी बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थ संकल्पात समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच बेस्टची आणखी भाडेवाढ देखील प्रस्तावित आहे . या सर्व उपाययोजनांमुळे तरी बेस्ट सारखी संस्था अस्तित्वात राहो याच सदिच्छा .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)