घटनाचक्र 2017 समाजकारण: असीमानंद सुटले…

अजमेर दर्ग्यामध्ये 2006 मध्ये घडविण्यात आलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी स्वामी असिमानंद यांच्यासह 6 जणांची यंदाचं निर्दोष सुटका झाली. राज्यातील शहरी भागातील सर्व बेकायदा बांधकामांना संरक्षण देऊन नियमित करण्यासाठी राज्य सरकारने नव्याने तयार केलेले धोरणही मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा, अवैध व राज्यघटनेतील अनुच्छेद 14 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारे असल्याचा निवाडा देत फेटाळून लावले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंहविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे नाहीत असे सांगत राष्ट्रीय तपास यंत्रणेने क्‍लीनचिट दिल्यांनतर साध्वी प्रज्ञासिंहला अखेर मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. बहुचर्चित मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल निवृत्त श्रीकांत पुरोहित याना तब्बल 9 वर्षांच्या तुरुंगवासानंतर हंगामी जामीन यंदा मिळाला त्यामुळे त्यांची सुटका झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)