घटनाचक्र 2017 समाजकारण: अण्णाभाऊ साठे महामंडळात फ्रॉड…

अण्णाभाऊ साठे महामंडळ या सामाजिक संस्थेमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण यंदा उघडकीस आले. या महामंडळात भरती प्रक्रिया न करता 73 जणांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याशिवाय भरती झालेल्याना 20 लाख रुपयांचे गृहकर्ज देण्यात आले होते. त्यापैकी 15 लाख रुपये लाच म्हणून देण्यात आले होते . अनेक कर्जाच्या प्रकरणांवर खोटी साह्य घेण्यात आल्या होत्या . याशिवाय महालक्ष्मी दूध संस्थेला 5 कोटी देण्यात आले होते तर विधानसभा निवडणुकीत रमेश कदम यांनी 6 कोटी 56 लाख रुपयांची खिरापत वाटली होती. या भ्रष्टाचारा प्रकरणी निलंबित आमदार रमेश कदम याला सत्र न्यायालयाने दणका देत त्याची 125 कोटींची मालमता जप्त करण्याचे आदेश दिले. एकूणच अशा भ्रष्टाचारामुळेच सामाजिक कार्यासाठी स्थापित झालेल्या अशा संस्था बदनाम होतात .त्यामुळे समाजाला लागलेली हि भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करणेच भाग आहे .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)