घटनाचक्र 2017 अर्थकारण ; राज्याचा अर्थसंकल्पही प्रभावी

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पाठोपाठच राज्याचा अर्थसंकल्प देखील सादर करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 65 वर्षांनंतर योजनांतर्गत आणि योजनेनंतर अशा 2 भागात मांडला जाणारा अर्थसंकल्प या वर्षांपासून महसुली आणि भांडवली अशा नव्या पद्धतीने मांडण्यात आला. यामुळे पूर्वी नियोजन आणि अर्थ खात्यांतर्गत विभागलेला अर्थसंकल्प यंदाच्या वर्षांपासून अर्थखात्याच्या नियंत्रणाखाली आला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2017-18 चा 4 हजार 511 कोटींच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. या अर्थसंकल्पात शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद करतानाच शहरातील पायाभूत सुविधांसाठी देखील लक्षणीय तरतूद करण्यात आली.

टपाल खात्याचे आधुनिकीकरण
ईमेल आणि इंटरनेटच्या जमान्यामुळे अडगळीत पडलेल्या टपाल खात्याचे दिवस आता बदलण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने यंदा देशभरात 440 पोस्ट बॅंक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील पहिली बॅंक ही औरंगाबाद इथे सुरू होणार आहे. याच बॅंकांच्या मार्फत पोस्टाने

स्वतःच्या विमा पॉलिसी विकण्याचा उपक्रम देखील सुरू केला असून पोस्ट बॅंका म्युच्युअल फंडाच्या योजनाही विकणार आहे. शिवाय याच पोस्ट बॅंकांच्या माध्यमातून आधार रिलेबल पेमेंट सुविधा सुरू करण्यात आल्या असून त्यात सरकारच्या विविध योजनांचे पैसेही मिळणार आहेत.

अँबी व्हॅलीवर कारवाई
अल्पावधीत दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या कंपन्यांनी यंदाही देशातील अनेक गुंतवणूकदारांना हातोहात फसवले आणि आपले उखळ पांढरे करून घेतले. अशाच प्रकरणात गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये थकवणाऱ्या सहारा समूहाला यंदा

सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला. 14 हजार कोटींची मुद्दल भरण्यासही टाळाटाळ करणाऱ्या या कंपनीला वठणीवर आणण्यासाठी न्यायालयाने तब्बल 39 हजार कोटी बाजारमूल्य असलेल्या लोणावळ्याजवळील कंपनीच्या अँबी व्हॅली या हिल स्टेशनची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला

मल्ल्याला लंडनमध्ये अटक
भारतीय बॅंकांची हजारो कोटींची फसवणूक करून परागंदा झालेल्या उद्योगपती विजय मल्ल्याला यंदा लंडनमध्ये स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी अटक केली. मात्र, अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला 3 तासातच सशर्त जामीन मंजूर केला. त्याची पुढील सुनावणी सुरू आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची विनंती भारताने केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)