घटनाचक्र 2017 अर्थकारण ; बॉम्बे स्टॉक एक्‍स्चेंज

यंदाचं मुंबई शेअर बाजारच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एक्‍स्चेंजचे गुजरातमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. सेबीने सर्व व्यवहार डिजिटल स्वरूपात करण्याचा घेतलेला निर्णय, टाटा सन्सच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखर यांची लागलेली वर्णी, अंदाजे 46 हजार लक्षाधीश व 28 अब्जाधीश यांचा समावेश असलेले मुंबई सर्वात श्रीमंत शहर असल्याचे एका अहवालात स्पष्ट, रिलायन्सने आपल्या ग्राहकांना दिलेली मोफत फोर जी सेवा, भारतीय महिला बॅंकेसह अन्य 5 बॅंकांचे स्टेट बॅंकेत झालेले विलीनीकरण, भारतीय रेल्वेने आजवरच्या इतिहासात 2016-17 या वर्षात 1.68 लाख कोटी इतके नोंदवलेले विक्रमाची उत्पन्न, महाराष्ट्रासह 8 राज्यांमध्ये दर रविवारी पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा घेतला गेलेला निर्णय, सेबीने पायाभूत सुविधांच्या निधी उभारणीसाठी पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टला दिलेली परवानगी, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भारताची आघाडी अमेरिकेला टाकले मागे, चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल उत्पन्नात झालेली घट, 7.9 वरून 7.1 वर,रिझर्व्ह बॅंकेने चलनात आणलेल्या 200 व 50 रुपयांच्या नव्या नोटा, सीकेपी बॅंकेत झालेला कोट्यवधींचा घोटाळा, मागील 3 वर्षात नव्या नोकऱ्यांमध्ये झालेली 60 टक्के घट, बेस्टचा महागलेला प्रवास, देशाच्या एकूण संपत्तीत 1 लाख कोटी डॉलर इतक्‍या उत्पन्नात झालेली वाढ, हैद्राबादमध्ये भरलेली जागतिक उद्योजकता परिषद, एक रुपयाच्या नोटेने साजरी केलेली शंभरी, या सर्व घडामोडींनी यंदाचे आर्थिक वर्ष सर्वच घडामोडींमुळे अर्थविश्‍वात यंदाच्या संपूर्ण वर्षात क्रांतीपूर्ण बदल होताना दिसला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)