यंदाचं पुण्यातील फडणीस ग्रुप ऑफ कंपनीने ठाण्यातील 800 ते 900 गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. बॅंकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून कंपनीने या गुंतवणूकदारांची 8 ते 10 कोटींची फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी कंपनीच्या अध्यक्ष विनय फडणीसह संचालक व एजंट विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले. तर पुण्यातील नामांकित डीएसके कंपनीच्या मालकांना अर्थात दिलीप सखाराम कुलकर्णींना गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे गेली अनेक वर्षे दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रात असलेल्या डीएसके समूहाची विश्वासार्हता संपुष्टात आली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0