घटनाचक्र 2017 अर्थकारण ; नोटाबंदीची वर्षपूर्ती

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात या नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती देखील झाली. याच पार्श्‍वभूमीवर नोटाबदलीचा हा निर्णय खरोखरच देशहिताचा होता का? या धोरणात्मक निर्णयामुळे जे फलित साध्य होणार त्या भ्रष्टाचाराचे देशातून समूळ उच्चाटन झाले का? नोटाबदलीच्या या निर्णयामुळे सरकारला अपेक्षित होता तो काळा पैसा खरोखरच बाहेर आला का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या नोटाबदलीमुळे देशातील नागरिकांना जे प्रचंड हाल सहन करावे लागले त्याचं काय? अशा प्रकारची या निर्णयाच्या विरोधातील आणि या निर्णयाच्या अपयशाची कारणमीमांसा करणारी भावनाच देशातील अर्थतज्ज्ञांपासून ते सर्वसामान्यांनी बोलून दाखवली. मात्र, असं असलं तरी केंद्र सरकारने मात्र नोटाबदलीच्या अनुषंगानेच यंदाच्या संपूर्ण वर्षात सातत्याने शेतकरी, महिला आणि गृहबांधणी व्यवसायाला चालना देणाऱ्या आर्थिक सवलतींच्या घोषणांची सरबत्ती सुरूच ठेवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)