देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गेल्या वर्षीप्रमाणेच धक्कातंत्राचा उपयोग करून ग्राहकांना सुखद धक्का दिला . इंटरनेट सेवेपासून वंचित असलेल्या 50 कोटी जनतेला डोळ्यासमोर ठेऊन फोरजी फोन मोफत देण्याची घोषणा मुकेश यांनी केली. या फोनला देशाचा स्मार्ट फोन अशी उपाधी देऊन तो मोफत दिला जाणार आहे. यामुळे देशात वेगाने इंटरनेट क्रांती होतेय आणि तितक्याच वेगाने देश डिजिटल बनतोय हे नक्की.
यंदाचं भारतातील सुमारे 6 हजार खासगी उद्योग तसेच सरकारी संस्थांची गोपनीय माहिती डार्कनेट या हॅकर्स ग्रुपने खुलेआम विकण्यास काढल्याचे उघड झाले. कंपनीचे आयपी ऍड्रेस तसेच व्यावसायिक डेटा उपलब्ध असल्याचे या ग्रुपचे म्हणणे होते.
धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये मुंबई शेअर बाजार आणि युआयडीआय आधार प्रणाली संस्था या देशातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या संस्थांचा समावेश होता . राज्यातील बोगस कंपन्या शोधून काढून त्यांचे आर्थिक व्यवहार थांबविण्याबाबत केंद्र सरकारने सूचना केल्यानंतर अशा प्रकारच्या 60 हजारांहून अधिक बोगस कंपन्या महाराष्ट्रात असल्याचे उघड झाले. त्यामुळे केंद्र सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत या कंपन्यांचे सर्व व्यवहार बंद करण्यात आलेले आहेत .
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा