घटनाचक्र 2017 अर्थकारण ; … आणि आला जीएसटी…

यंदाच्या संपूर्ण वर्षातील देशातील अर्थकारणाला नवे वळण नवी दिशा देणारी आणि वर्षभर गाजावाजा होत राहिलेली महत्त्वपूर्ण घटना अर्थातच जीएसटी. संपूर्ण देशाचे एका बाजारपेठेत रूपांतर करण्यासाठी गुड्‌स अँड सर्व्हिस टॅक्‍स अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करावा अशी शिफारस 2003 साली केळकर समितीने केली होती आणि अनेक प्रकारच्या बैठका घेऊन प्रत्येक उत्पादनांच्या संदर्भात लागू करण्यात येणाऱ्या कर रचनेसंदर्भात विचारविनिमय होऊन अखेर 1 जुलैपासून संपूर्ण देशभरात अखेर जीएसटी लागू करण्यात आला.

एक राष्ट्र एक कर या संकल्पाने अंतर्गत लागू झालेल्या जीएसटी करप्रणालीमुळे काही वस्तू व सेवा महाग झाल्या. तर काही सेवा आणि वस्तू स्वस्त झाल्या. प्रामुख्याने कॅनडा, ब्राझील व सिंगापूर या देशांच्या जीएसटीचा अभ्यास करून भारतीय अर्थव्यवस्थेची जीएसटी रचना करण्यात आली आहे. जीएसटी लागू करताना वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा यांचा विचार करण्यात आला असून हार्मोनाईझ्ड सिस्टीम कोड या आयात निर्यातीसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या कोडचा वापर करण्यात आला आहे.

या पारदर्शी पद्धतीच्या कर प्रणालीमुळे करचुकवेगिरी करणाऱ्यांची मात्र भंबेरी उडाली आहे हे नक्की. गेल्या संपूर्ण वर्षभरात शेअर बाजार अस्थिर असूनही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याला गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. एएमपीच्या एका अहवालानुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीत म्युच्युअल फंडातील एकूण मत्तेचे प्रमाण 18 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे . गेल्यावर्षी याच कालावधीतील एकूण मत्तेपेक्षा हे प्रमाण 4.76 लाख कोटी रुपयांनी अधिक आहे .

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)