घटनाचक्र २०१७ क्रीडांगण…

2017 या संपूर्ण वर्षात भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी तपासण्यासाठी आपण प्रथम क्रिकेटच्या मैदानात डोकावणार आहोत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायाधीश राजेंद्र लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या भारतीय क्रिकेट बोर्डाला न्यायालयाने यंदा वर्षाच्या सुरवातीलाच जोरदार दणका दिला. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के याना त्यांच्या पदावरून न्यायालयाने दूर केले आणि बोर्डाच्या कामात लक्ष घालण्यास मनाई केली.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेटची दिशा आता कशी असणार ? याविषीयीच्या चर्चेला मग उधाण आले. या समितीने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या बीसीसीआयच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी अखेर सर्वोच्च न्यायालयाने 4 सदस्यीय प्रशासक समिती नियुक्त केली. माजी महालेखापाल विनोद राय यांची समितीचे कप्तान म्हणून निवड करण्यात आली. समितीच्या इतर सदस्यांमध्ये क्रिकेट इतिहासकार म्हणून ओळखले जाणारे रामचंद्र गुहा, इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हल्पमेंट फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम
लिमये,भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांचा समावेश करण्यात आला.

सुबोध रणशेवरे 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)