घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; ऑस्ट्रेलियावर मात

ऑस्ट्रेलिया विरुद्धची वन डे मालिका देखील भारतीय संघाने रोहीत शर्मा आणि अजिंक्‍य राहणे यांच्या शतकी भागीदारीमुळे 4-1 च्या फरकाने जिंकली. तर गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताने वन डे पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धची टी 20 मालिकाही खिशात टाकली. याच मालिकेदरम्यान कर्णधार विराट कोहलीने वनडेमध्ये शतकी खेळी करत वेगवान 9000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम देखील केला. यंदाचं भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत मैलाचा दगड गाठला. कसोटीत झटपट 300 विकेट्‌सचा टप्पा गाठणारा तो पहिलाच फिरकी गोलंदाज ठरला . अश्विनने 54 कसोटींमध्ये हा विक्रम करताना डेनिस लिली याना 56 कसोटी मागे टाकले . पाहुण्या श्रीलंकेने अवघ्या 135 धाव करूनही रंगतदार ठरलेल्या तिसऱ्या आणि अखरेच्या टी 20 सामन्यात अखेर भारताने पाच विकेट्‌स आणि 4 चेंडू राखून विजय मिळवला. आणि हि 3 सामन्यांची मालिका जिंकली.

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अभूतपूर्व गोंधळानंतर माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांची तर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान यांची नियुक्ती बीसीसीआयने केली . आयपीएल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्पर्धेला आयोजित करण्यास मंजुरी देण्यास मान्यताप्राप्त म्हणून दर्जा देण्यास किंवा त्याला पुढील 10 वर्ष भारतीय क्रिकेट बोर्ड पाठबळ देणार नाही असे आश्वासन इंडियन प्रीमिअर लीगचे प्रसारण करणाऱ्या माध्यमांना दिल्याबद्दल बीसीसीआयवर राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने 52.24 कोटींचा दंड यंदा आकारला . एकूणच यंदाच्या संपूर्ण वर्षातील भारतीय संघाची क्रिकेटमधील कामगिरी हि कौतुकास्पद अशीच होती .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)