घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; बुद्धिबळ

भारताची ग्रॅंडमास्टर द्रोणवली हरिका हिला सलग तिसऱ्यांदा महिलांच्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्‍यपद स्पर्धेत ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीच्या टायब्रेकमध्ये चीनच्या टॅन झोनगीने पराभव केल्याने हारिकच्या पदकाचा रंग ब्रॉन्झचाच राहिला. रशियातील बुद्धिबळ स्पर्धेत एकापेक्षा एक ग्रॅण्डमास्टर्सचा पराभव करत आणि बरोबरीचे धक्के देत कोल्हापूरची कन्या ऋचा पुजारीने वुमन इंटरन्याशनल मास्टरचा किताब पटकावला बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय पातळीवर इतकी मोठी झेप घेणारी ऋचा कोल्हापूरची पहिली खेळाडू ठरली.

भारताच्या आकांक्षा हगवणेने ताशकंद मध्ये झालेल्या एशियन युथ बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयश मिळवले. भारताचा जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला यंदा अलटीबॉक्‍स नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत पराभवाचा सामना पत्करावा लागला. हॉलंडच्या अतिश गिरीने आनंदचा पराभव केला. मात्र सिंगलफिल्ड नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आनंदने जागतिक ऱ्यांकिंग मध्ये दुसरा क्रमांकावर असलेल्या फ्याबियानो कॅरोनाला हरवत विजय संपादन केला . तर आयझाक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत देखील आनंदने विजय मिळवला. एकूणच बुद्धिबळाच्या पटावरील भारताची यंदाची कामगिरी अदखलपात्र स्वरूपाचीच होती .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)