घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; राष्ट्रकूल नेमबाजी

नोव्हेंबर महिन्यात ब्रिस्बेन येथे राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत जितू राय आणि हिना सिधूने 10 मीटर पिस्तूल मिश्र प्रकारात सुवर्णपदक विजेती कामगिरी केली . तर 90 मित्र प्रकारच्या दीपक कुमारने ब्रॉन्झ मिळवले . याच स्पर्धेत गगन नारंगने रौप्य पदक मिळवले तर स्वप्नील कुसळे आणि अनु राजसिंगने ब्रॉन्झ पदकाची कमाई केली . भारताच्या प्रकाश नागप्पा आणी अंकुर मित्तलनेही या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. या स्पर्धेत भारताने तब्बल 20 पदकांची कमाई केली. भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर सुशीलकुमारने इंदूर येथील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले. तर राहुल आवरणे या स्पर्धेत 65 किलो फ्रीस्टाईल गटात सुवर्णपदकाची कमाई केली.

इराणमधील तेहरान येथे झालेल्या आशियाई अजिंक्‍यपद कबड्डी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघाने जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत भारताच्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला पाकला नमवून भारतीय संघाने हा विजय मिळवला. धावपटू गोपी थोनकलने 18 व्या आशियाई सॅरेथॉन अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कामगिरी केली आणि असा विजय मिळवणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला. भारतीय नेमबाजांनी 10व्या आशियायी एअरगन नेमबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत 5 पदकांची कमाई केली. यामध्ये पिस्तूल नेमबाज जितू राय आणि हिना सिद्धू यांनी ब्रॉन्झ पदक मिळवले. सलग 2 ऑलिम्पिकमध्ये पदके पटकावून देणारा मल्ल सुशीलकुमारने राष्ट्रकुल कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्णपदकाची कामगिरी केली पुण्याच्या अभिजित कटकेने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत साताऱ्याच्या किरण भगतवर 10-7 अशी मात करत प्रतिष्टेची गदा पटकावली आणि महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. भारताचा गॉल्फर शुभंकर शर्माने मॅक्‍लिओड रसेल टूर चॅम्पियनशिप पटकावली . या जेतेपदासह त्याला 1 . कोटीचे इनामही लाभले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)