घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; अमेरिकन ओपन

यंदा अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचे जेतेपद स्लोगन स्टीफन्सने मिळवले. या झुंजीत स्लोगनने अमेरिकेच्याच मेडिसीन कीजला एकतर्फी नमवले. बिनसिडेड टेनिसपटू म्हणून ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेमधे महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी स्टीफन्स हि पाचवी टेनिसपटू ठरली. ओपनच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये यंदा दोन्ही शिलेदार या अमेरिकेच्याच होत्या.

राखेतून आकार घेणे म्हणजे काय ? हे यंदाच्या टेनिस मोसमातील रफायल नादालची कामगिरी बघून समजते. मोसमाच्या अखेरची अमेरिकन ओपन स्पर्धाही नादालने दिमाखात जिंकली. दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनवर 6-3 ,6-3,6-4 अशी मात करत कारकिर्दीतील तिसरे अमेरिकन ओपन जेतेपद त्याने पटकावले. यंदाची अमेरिकन ओपन स्पर्धा स्वित्झर्लण्डच्या मार्टिना हिंगिसला दुहेरी आनंद देणारी ठरली. या टेनिसपटूने तैवानच्या च्यान यंग ज्यानसह खेळताना लूसी व कॅटरिना सिनियाकोव्हा यांच्यावर मात करत दुहेरीचे जेतेपद मिळवले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)