घटनाचक्र २०१७ क्रीडांगण ; पुण्यात डेव्हिस कप

यंदाची तब्बल 42 वर्षांनी पुण्यात झालेली डेव्हिस कप लढत संस्मरणीय ठरली. यजमान भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4-1 असा पराभव केला. एकेरीत राजकुमार रामनाथने न्यूझीलंडच्या फिन तिगरणीला पराभूत केले. आणि भारताचा विजय निश्‍चित केला. तर केवळ औपचारिकता म्हणून उरलेल्या लढतीत युकी भांबरीने बाजी मारली.

जागतिक टेनिस रॅंकिंग मध्ये 116 व्या क्रमांकावर असणाऱ्या रशियाच्या एव्ह्गेनी डोंस्कॉमने दुबई ओपन टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला यंदा पराभवाचा धक्का दिला. मात्र याच फेडररने इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत एकेरीचे पाचव्यांदा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. या स्पर्धेतील अंतिम फेरीत त्याने आपला मित्र स्टेन वोवरिंका याला पराभूत केले. त्यानंतच्या मायामी स्पर्धेचे जेतेपद देखील रॉजरने राखले. तर स्पेनच्या रफाल नदालने माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेचे पाचव्यांदा जेतेपद मिळवले.

जून महिन्यात संपन्न झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत यंदा भारताच्या रोहन बोपण्णा ने इतिहास रचला. कॅनडाची त्याची सहकारी ग्रॅबीएला दाबरोवस्कीसह त्याने मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले. बोपण्णाचे हे पहिलेवहिले ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले . या दोघांनी याना लीना ग्रोपण फिल्ड जर्मनी व रॉबर्ट फराह कोलंबिया यांची कडवी झुंज 2-6,6-2,12-10 अशी मोडून काढली. ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणारा तो चौथा भारतीय ठरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)