ग्लोबल नॉलेज किर्ती राज्यभर पोहचेल : भांडारी

अभयकुमार साळुंखे यांना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार प्रदान

उंब्रज – ग्लोबल नॉलेजची किर्ती पर जिल्ह्यात पोहोचली असून राज्यभरातही पोहचेल. ग्लोबल एक्‍स्पोच्या माध्यमातून महेशकुमार जाधव यांनी एक अनोखा शैक्षणिक उपक्रम राबवून शिक्षणाची नवीन चळवळ उभी केली आहे. अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे नवी पिढी घडेल, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उंब्रज, ता. कराड येथील ग्लोबल नॉलेज एक्‍स्पो कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ग्लोबल एक्‍स्पोचे प्रणेते महेशकुमार जाधव, प्राचार्य अशोक कारंडे, चंद्रहास शेजवळ, विशाल शेजवळ, शरद साळुंखे, प्रशांत कदम, राजेंद्र महासले यावेळी उपस्थित होते.

माधव भंडारी म्हणाले, शिक्षण क्षेत्रात अभयकुमार साळुंखे यांचे कार्य मोठे आहे. त्यांना ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार प्रदान करताना आनंद होत असून छोट्या शिक्षण संस्था चालकांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळणार आहे.
अभयकुमार साळुंखे म्हणाले, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या शताब्दी वर्षात माझा सन्मान होतो याचा मला सार्थ अभिमान आहे. जे काम करतोय त्या पलीकडे जाऊन काम करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मला मिळाली आहे. महाराष्ट्राच्या भुमीत शैक्षणिक क्रांती घडवणारी माणसे घडली आहेत. अनेक दिग्गजांनी शिक्षणाचा जागर केला. शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे पारतंत्र्याच्या काळात असताना क्रांतिकारी व्यक्तींचे विचार घेऊन स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण काय केले पाहिजे याचे चिंतन बापूजींनी करुन शिक्षणाची कास धरली पाहिजे.

ग्रामीण भागातील लोकांपर्यंत ज्ञानगंगा पोहचवली. बापूजी साळुंखे यांनी कर्मवीर अण्णांच्या शिक्षण संस्थेत ही काही काळ काम केले. त्यातूनच त्यांनी स्वावलंबी शिक्षणाचे धडे गिरवले बापूजींनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण संस्थेची स्थापना केली. बापूजींच्या सहवासातून आमचं व्यक्तिमत्त्व घडत गेलं आपले अमृतुल्य विचार हा समाजामध्ये दिला पाहिजे. असेही ते म्हणाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेशकुमार जाधव, प्राचार्य अशोक कारंडे यांनी मनोगत व्यक्त केले. मानपत्र वाचन चंद्रहास शेजवळ यांनी केले. तर आभार विशाल शेजवळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)