ग्लोबल नॉलेज एक्‍स्पो : सर्वकाही एकाच छत्राखाली

उंब्रज – ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा. याचबरोबर आधुनिक युगातली शैक्षणिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात नानाविविध माहिती मिळावी, याकरिता ग्लोबल नॉलेज एक्‍स्पोचे आयोजन करण्यात आले असून यात शिक्षण व करिअरविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने गृहोपयोगी विविध वस्तूंचे स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, नामवंत पब्लिकेशनचे अनेक बुक स्टॉल यांचे एकाच छत्राखाली उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजचे अध्यक्ष महेशकुमार जाधव यांनी दिली.

उंब्रज, ता. कराड येथील ग्लोबल इंग्लिश मिडीयमच्या वतीने 4 ते 8 जानेवारी दरम्यान ग्लोबल नॉलेज एक्‍स्पो या कृषी, शैक्षणिक व औद्योगिक महाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शना दरम्यान ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा, व्याख्याने, विज्ञान, चित्रकला, श्वान प्रदर्शन यासह नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. ग्लोबलच्या माध्यमातून समाजात असामान्य काम करणाऱ्या माणसांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी यासाठी ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे. यावर्षी हा पुरस्कार प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे यांना जाहिर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामीण भागातील सर्वाचे आकर्षण ठरत असलेल्या या महाप्रदर्शनाचा औपचारिक शुभारंभ गुरुवार, दि. 3 जानेवारी रोजी होणार असून सायं 4 वाजता ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. सदस्य मनोज घोरपडे हे उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटन समारंभ शुक्रवार, दि. 4 रोजी दुपारी 12 वाजता महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुलबाबा भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नियोजन समितीचे सदस्य मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

शुक्रवार, दि. 4 रोजी दुपारी 3 वाजता कोल्हापूर येथील निवृत्त सहसंचालक संपत गायकवाड यांचे आई या विषयावर व्याख्यान होणार आहे. दुपारी चार वाजता सिनेअभिनेते समृद्धी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मातृवंदना व मातृपूजन समारंभ, रात्री 7 वा. ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा. शनिवार, दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता चित्रकला स्पर्धा, दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथील प्रा. पवन पाटील यांचे राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री सात वाजता ग्लोबल टॅंलेट सर्च स्पर्धा.

रविवार, दि. 6 रोजी सकाळी 11 वाजता डॉग शो, दुपारी 2 वाजता प्रा. सुभाष खोत यांचा कथाकथनचा कार्यक्रम, रात्री सात वाजता ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा. सोमवार, दि. 7 रोजी दुपारी 2 वाजता प्रा. भिकाजी लाड यांचे शिवरायांचे प्रशासन या विषयावरील व्याख्यान होणार आहे. रात्री 7 वाजता ग्लोबल टॅलेंट सर्च स्पर्धा. मंगळवार, दि. 8 रोजी दुपारी 2 वाजता पुरस्कार प्रदान व बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. यावर्षीचा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्कार प्रा. डॉ. अभयकुमार साळुंखे यांना देण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी भाजपाचे मुख्य प्रवक्‍ते माधव भंडारी, सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगांवकर, विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुल भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घेण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)