ग्रोईंग स्ट्रॉंगर टुगेदर, या भावनेतून संसदेचे अधिवेशन पार पडेल – पंतप्रधान

नवी दिल्ली – ग्रोईंग स्ट्रॉंगर टुगेदर हे जीएसटीचे स्पीरिट आहे आणि याच भावनेतून संसदेचे पावसाळी अधिवेशन सामंजस्याने पार पडेल असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले की या अधिवेशनात चांगल्या दर्जाची चर्चा होईल आणि यातून योग्य ते मुल्यवर्धन होईल असा मला विश्‍वास आहे.

या संसद अधिवेशनाला विशेष महत्व आहे असे नमूद करताना ते म्हणाले की याच अधिवेशनात देशाचे नवीन राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडले जाणार आहेत आणि येत्या पंधरा ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके पुर्ण होणार आहेत. हे मान्सुन सेशन आहे. आणि मान्सुन आशा घेऊन येतो. त्याच प्रमाणे हे अधिवेनही काही चांगल्या आशा घेऊन येत आहे असे ते म्हणाले.उन्हाळ्यानंतर येणाऱ्या मान्सुनच्या पावसाने मातीला चांगला वास येतो. तसाच वास जीएसटीच्या अंमलबजावणीच्या भावनेने संसदेच्या या अधिवेशनालाही येईल असा मला विश्‍वास आहे.

अमाप उत्साही वातावरणात हे अधिवेशन पार पडेल असेही ते म्हणाले. सर्व पक्ष एकत्र आले की देशहिताचा चांगला निर्णय होऊ शकतो हे जीएसटी विधेयकाने देशाला दाखवून दिले आहे. त्याच भावनेने हेही अधिवेशन पार पडेल असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)