ग्रेड सेप्रेटरमुळे धुळीचे साम्राज्य

सातारा -सातारा येथे ग्रेड सेप्रेटरचे काम गतीने सुरू असले तरी आजूबाजूच्या परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण होवू लागले आहे. त्यामुळे यापरिसरातील नागरिक, व्यापारी त्रस्त होवू लागले आहेत. ग्रेड सेप्रेटरच्या कामासाठी पोवई नाक्‍यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे. त्यामुळे तहसील कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालय मार्ग, सयाजी हायस्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात नागरिकांना दररोज धुळीचा सामना करावा लागत आहे.

काम सुरू असलेल्या परिसरात रयत शिक्षण संस्था, सेंट पॉल स्कूल, तसेच अनेक रुग्णालये आहेत. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांसह रुण्णांनाही धुळीमुळे श्‍वसनाचे आजार होण्याची शक्‍यता आहे. पोवई नाका परिसरातील गल्लीबोळातही आता ट्रॅफिक जॅम होवू लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)