ग्रेट पुस्तक महाश्‍वेता

‘अस्मिता’च्या वाचकांना नमस्कार.

आज मी डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांच्या “महाश्‍वेता’ या कादंबरीविषयी सांगणार आहे. काही वर्षांपूर्वी ही कादंबरी मालिकेच्या रूपातही दाखवण्यात आली होती. “भय इथले संपत नाही’, अशा सुरेख गाण्याने या मालिकेची सुरूवात व्हायची. सुधा नावाच्या अतिशय सुंदर तरुणीची ही कथा आहे.

सुधा एका छोट्या गावात तिच्या आई वडिल व भावंडासह रहात असते. घरची परिस्थिती अतिशय साधी. अशात एक दिवस तिला एका इनामदार घराण्यातून लग्नासाठी मागणी येते. माधव एक सुंदर श्रीमंत इनामदार घराण्यातला. आई-वडील नसलेल्या माधवचा सांभाळ त्याच्या काकूने केलेला असतो. या काकूला स्वतःचे मूल नसल्यामुळे तिने एका मुलाला दत्तक घेतलेले असते. घराचा सर्व कारभार काकीचं पाहत असल्यामुळे अतिशय धार्मिक आणि शिस्तीचे वातावरण घरात. मुळात माधवाने एका गरीब घरातील मुलीस धाकटी इनामदारीण बनवून आणलेले त्यांना पसंतच नसते. पण माधवच्या पुढे त्यांचे काही चालत नाही.

माधव समवेतच्या सुखी संसारात सुधा हरवून जाते. पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते. सुखाच्या एका क्षणी माधवला तिच्या पायावर एक कोडाचा पांढरा डाग दिसतो. त्या क्षणी माधव कोलमोडून पडतो. सौन्दर्यप्रेमी माधव सौन्दर्याशिवाय तिच्यासोबत आयुष्य काढूच शकत नाही, असे तिला सांगून तिच्यापासून दूर राहतो. घरात काकी आणि इतरांकडून तिची मानसिक विटंबना होते. तिचा कोणीही स्वीकार करण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीत तिला माहेरी सोडले जाते. माहेरच्यांसाठीसुद्धा हा खूप मोठा धक्का असतो. तरी ते तिला सांभाळायचे ठरवतात. तिच्या बहिणींचे लग्न ही मोडते आणि ती त्यासाठी सुधालाच जबाबदार धरते त्यामुळे सगळीकडून सुधा हतबल, लाचार आणि दीनवाणी होते. तिची मावशी तिला काशी यात्रेच्या निमित्ताने डॉक्‍टरकडे घेऊन जाते. पण त्याचा फारसा उपयोग होत नाही पण यात तिची भेट एका प्रेमळ वृद्ध स्त्री सोबत व एका अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या स्वामींबरोबर होते. तिथून पुढे सुधाचे जीवनचक्र बदलत जाते. माधव गाव सोडून एका मित्राच्या खोलीवर मुंबईला राहायला येतो. या मित्रामुळे कथेला खूपच वेगळे वळण लागते.

इकडे सुधा या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येते. तिच्या जगण्याचे ध्येय तिला गवसते. पुढे माधवला त्याची चूक कळते का? तो मित्र कोण असतो? सुधा माधव एकत्र येतात का? हे सगळे जाणून घेण्यासाठी “महाश्‍वेता’ नक्की वाचा.

सुधा मूर्तींनी पण याच नावाने ही कादंबरी लिहिली. पण या कादंबरीबद्दल त्यांना आधी माहित नव्हते असेही त्या म्हणाल्या. तर शारीरिक सौन्दर्यच सर्व काही नाही; त्याच्या पुढेही जीवनाचे काही उद्दिष्ट असतात हे डोळसपणे दाखवणारी कादंबरी नक्की वाचा.

– मनीषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)