ग्रेट पुस्तक : दौंड-पुणे शटल

अस्मिता’च्या वाचकांना मनापासून नमस्कार

हाडाचे डॉक़्टर म्हणून तर डॉ. अमित बिडवे प्रसिद्ध आहेतच; पण हाडाचे लेखक ही आहेत. यापूर्वीही त्यांच्या “दिल दोस्ती डॉक्‍टरी’ तसेच “सेमी प्रायव्हेट रूम’बद्दल केलेले लेखन आपण वाचले होतेच. आज मी त्यांचे वाचलेले “दौंड-पुणे शटल’ हे तिसरे पुस्तकही मनाला स्पर्शून जाणारे आहे, असे मला वाटते. मानवी नात्यांची भावनिक गुंतागुंत आणि त्याची उकल एकाच कथेत सहजतेने वाचायला मिळते हेच खरे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाचे नावच आहे आगळेवेगळे असे “दौंड-पुणे शटल.’ आणि मुखपृष्ठ पाहाल तर लोकलच्या डब्याचा फील त्यामध्ये दिसतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नावाप्रमाणेच या पुस्तकाचा प्रवास जातो माणसांच्या भावनिक गावातून. अनेक छोट्या छोट्या कथांनी भरलेले हे पुस्तकं फक्त करमणूक न करता माणसांना जोडायला शिकवते. आकाशाची झेप घेताना पाय जमिनीवर ठेवायला लावणारे हे पुस्तकं आयुष्याला वेगळीच कलाटणी देऊन जाते. तसे पाहायला गेले तर हे पुस्तकं लेखकाच्या आयुष्यातील छोटे छोटे ते क्षण आहेत, ज्यामुळे ते खूप काही जवळून अभ्यासू शकले. त्यांच्या आठवणी आणि अनुभव ही म्हणता येती; पण जेव्हा हे एखादा वाचक वाचत असतो तेव्हा तो पुस्तकाशी इतका समरस होतो की त्याच्या मनावर ते कोरले जाते.

या पुस्तकातली पहिलीच कथा, “आठवण’ मनाला हेलावून टाकणारी आहे. तसेच “आपुलकी’ या कथेमध्ये लेखकाने वडिलांबाबतच्या आठवणी सांगितल्या आहेत. पेशंट म्हणून येणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबातून लेखकास मिळालेली आपुलकीची वागणूक, वडिलांसोबत घेतलेला अनुभव पुढे त्यांच्या मुलाला ही मनसोक्त घेऊ देणारे हे कुटुंब आणि त्यांचे तितक्‍याच अगत्याने करणारे कुटुंब दोन्ही प्रसंग वाचताना आपल्याला ही नकळत माणुसकी शिकवून जाते. लेखकाने दुसरा अनुभव याच्या अगदी विरुद्ध सांगितला आहे.

स्वतःच्या मुलीचा झालेला अपघाताचे भांडवल करून एक बाप कसा पैसे मिळवतो याचे हृदयद्रावक वर्णन लेखकाने केले आहे. जगात अशीही माणसे आहेत यावर विश्‍वास बसणेच कठीण. लेखकाचे चांगले वाईट अनुभव आपल्याला ही खूप अनुभव देऊन जातात.

डॉ. बिडवे यांचे लिखाण छान आणि मार्मिक आहे शेवटची एक कथा बंध मनाला अगदी हेलावून टाकणारी आहे. डोळ्यात नकळत पाणी आणणारी आहे. माणसाचे अनुभव त्याला जन्मभर पुरतात, हसवतात, शिकवतात, हेच खरे. लेखकाच्या संवेदनशील मनाचे, लिखाणाचे हे पुस्तकं सर्वोत्तम उदाहरण आहे. अतिशय छान पुस्तकं एकदा तरी नक्‍की वाचा.

धन्यवाद.

– मनिषा संदीप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)