ग्रेट पुस्तक : टाईमपास

अस्मिताच्या वाचकांना पुन्हा एकदा नमस्कार…

ती आली, तिने पाहिले, तिने जिंकून घेतले सारे… मुक्त छंद जगणारी मॉडेल, म्हणून जी सत्तरीच्या दशकात कायम चर्चेत राहिलेली ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी यांचे “टाइमपास’ हे आत्मचरित्र वाचण्यात आले. सहज समोर दिसले म्हणून खरे तर हातात घेतले.

एकदम नवीन विषय, वादग्रस्त व्यक्तीचे आत्मचरित्र उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली. तसे पाहिले तर या पिढीला फारशी तिची कारकीर्द नक्कीच माहीत नसेल. पण सत्तरीच्या दशकात ती तिच्या स्वछंदी जगण्यामुळे प्रसिद्ध नक्कीच होती… बिनधास्त मॉडेल म्हणून ती सुरुवातीला चर्चेत राहिली त्यानंतर तिच्या अथक प्रयत्नाने तिने उडिसा नृत्यांगना म्हणून लोकांच्या मनात आदर निर्माण केला.

तिने या आत्मचरित्राला “टाइमपास’ हे नाव का दिले असावे, याचा प्रश्नच पडला होता, पण जसे जसे ते वाचत गेले तसे तसे उलगडा होत गेला. आयुष्यालाच “टाईमपास’ समजणाऱ्या प्रोतिमाने तिच्या आत्मचरित्रात तिच्या आयुष्याचा एक ना एक कोपरा एका एका शब्दातून व्यक्त केला आहे. धाडसी, बुद्धिमत्ता आणि सौंदर्य या तिन्हींचा मिलाफ असलेली तिने कबीर बेदी सोबत विवाह केला. दोन मुले झाल्यानंतर त्यांच्यात समजुतीने घटस्फोटही झाला. पुढे मित्र म्हणून ते कायम सोबत राहिले.

समाज मान्यता देणार नाही अशा प्रत्येक गोष्टी तिने केल्या, कोणत्याही बंधनाला ना जुमानता ती सपाटून जगली. तिच्या बुद्धिमत्तेने आणि तारुण्याने तिने अनेकांना घायाळ केले, पंडित जसराज यांच्यासारखे अनेक मोठे नामवंत तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन गेले. तिच्या आयुष्याचा मोठा भाग होऊन गेले.

लग्न, वैवाहिक आयुष्य, अनेक पुरुषांसोबत आलेले संबंध, किती तरी जणांची आयुष्य समृद्ध केल्याचेही तिने स्पष्टपणे परखडपणे, बिनधास्त लिहले आहे…तिच्या मुलाच्या मृत्यूने तिच्यामध्ये कमालीचा बदल घडवून आणला.

जगा स्वछंद पण स्वैराचाराला आळा घालता आला पाहिजे. आयुष्याच्या कथानकावर फक्त आणि फक्त तुमचाच हक्क आहे. चुका करा पण त्या मान्य करण्याची, सुधारण्याची ताकद ही तुमच्यात असू द्या, ध्येय गगनाला भिडणारे असले तरी तुमचे पाय जमिनीवर असू द्या, मुक्त जगत असला तरी मर्यादाचे भान ठेवा, कोणाला इजा होईल हे वर्तन तर चुकीचेच.. पुस्तकं कोणतेही असो ज्ञान अवश्‍य मिळते शेवटी तुमचा दृष्टिकोन ही महत्त्वाचा, काय बोध घ्यायचा, कुठे थांबायचे हेही कळले पाहिजे.. आयुष्याला टाइमपास समजणारी ती ललना जेव्हा आयुष्याकडे गांभीर्याने पाहू लागते, आयुष्य टाइमपास नाही या विचाराने प्रेरित होते तेव्हा तिचे जीवन पूर्ण बदलते. तिचा धक्कादायक मृत्यू ही तिच्या मनासारखाच झाला, असे पूजा बेदी म्हणते.

आईच्या आठवणीला तिनेही पुस्तकाच्या शेवटी शेवटी उजाळा दिला आहे पुस्तक छान आहे, बिनधास्त लिखाण आहे याचा मराठी अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला आहे.

पुस्तक नक्की वाचा, धन्यवाद…

– मनीषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)