ग्रेट पुस्तक : झाडाझडती

आम्हा नाही हक्क जगण्याचा
आमचे मरणही स्वस्त…
डोळ्यातचं आटले पाणी आम्ही धरणग्रस्त…
जन्म दिलास तूच ठेव डोक्‍यावर हस्त..
आम्ही धरणग्रस्त… आम्ही धरणग्रस्त…

मनाला सुन्न करून जाणारे पुस्तक वाचून या कवितेच्या ओळी आपसूकच सुचत गेल्या. थोडा वेळ तसाच जाऊ दिला आणि अभिप्राय लिहायला घेतला. विश्वास पाटील यांची झाडाझडती ही धरणग्रस्तांची व्यथा सांगणारी कादंबरी. विश्वास पाटील हे नाव साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते ते संवेदनशील विषय आणि वेगळ्या धाटणीचे लिखाण तसेच “पानिपत’सारख्या अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहील्या. लिखाणाची शैली आणि सामाजिक विषयात हात घालणाऱ्या लेखकाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्यांनी यावेळी धरणग्रस्तांची व्यथा या पुस्तकातून मांडली. एका छोट्याश्‍या गावाची कथा आणि व्यथा.

गाव धरणात जाणार कळल्यापासून गावातील लोकं काळजीत पडतात ते ज्या गावात आयुष्य घालवले, पिढ्यान्‌पिढ्या संसार केला, एक एक आठवणी जिथे जपल्या गेल्या, ते गाव क्षणात नाहीसे होणार… पाण्यात जाणार, या विचाराने गाव पेटून उठतो आणि सुरू होतो सरकार विरुद्ध संघर्ष. गावातील एक एक पात्र मनाला घर करून जाणारे आहे. गावातील खैरमोडे मास्तरांची गाव वाचवण्याची धडपड त्यासाठी वाट्टेल तितका त्रास सहन करायची तयारी… त्यांच्या मुलीवर झालेला अत्याचार, लोकांची हतबलता, दुःख, राग, लेखकाने हा संवेदनशील विषय अगदी सचोटीने हाताळला आहे. गावातील एकमेकांसोबत वैर, आपल्या स्वार्थाचा विचार करणारी लोकं.. मास्तरांची गाव वाचवताना गावातीलच लोकांनी केलेली दुर्दशा अगदी मनाला जाऊन भिडते… शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश येते की नाही, गावाचे काय होते, राजकारणाच्या ताकदीमुळे सामान्यांची होणारी झाडाझडती कशा प्रकारे त्यांचे आयुष्य भयंकर बनवते… त्यातून ते कसे मार्ग काढतात हे जाणून घेण्यासाठी ही कादंबरी नक्की वाचा.

– मनीषा संदीप 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)