ग्रेट पुस्तक : “कोमा’

अस्मिताच्या वाचकांना नमस्कार…

दोन-तीन दिवसांपूर्वीच एक चित्तथराक कहाणी वाचून संपवली. कथा खरे तर काल्पनिक आहे पण वास्तवाचे भयंकर रुपडे उलगडणारी आहे. पुस्तकाचे नाव आहे “कोमा.’ हे रॉबिन कुक या लेखकाने लिहले आहे. त्याचा मराठी अनुवाद रविन्द्र गुर्जर यांनी केला आहे.

याची सुरवात एका 23, वर्षीय तरुणीच्या छोट्याशा आजारापासून होते. पोट दुखते आहे म्हणून ती एका नावाजलेल्या हॉस्पिटलमधे दाखल होते तेंव्हा डॉक्‍टर तिला एक छोटीशी शस्त्रक्रिया करायला सांगतात. अगदी अर्धा तासात बरी होऊन तिच्यासाठी खास सुट्टी घेऊन आलेल्या नवऱ्यासोबत मस्त एन्जॉय करणार, याचे स्वप्न रंगवत ती शस्त्रक्रियेसाठी तयार होते. तिला भुलीचे इंजेक्‍शन दिले जाते. काही क्षणात तिची शुद्ध हरपते ती कायमचीच. डॉक्‍टर शक्‍य तितके प्रयत्न करत असूनही तिचा मेंदू बाद होतो आणि ती कोमात जाते. मॅक नावाच्या डॉक्‍टरकडे काही विद्यार्थी प्रॅक्‍टिससाठी याच हॉस्पिटलमध्ये  येतात. मॅकला त्यातील एक बुद्धिमान असलेली त्याच्या विद्यार्थिनीबद्दल एक हळूवार भावना निर्माण होते. पण तिला या सगळ्यांपेक्षा कोमा पेशंटबद्दल फारच उत्सुकता आणि त्यांच्यावर खोलात जाऊन अभ्यास करण्याची फार इच्छा असते. मग त्या दोघात नेहमीच त्यांच्यावरून मतभेद होत असतात.

एक दिवस बर्मन नावाचा तीस वर्षांचा तरुण एका अपघातात पायाला थोडा मार लागलेला असतो म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल होतो त्याच्यावर सुद्धा एक छोटी शस्त्रक्रिया होते. यावेळी प्रसिद्ध अशा भूलतज्ञाला बोलवण्यात येते. तरी यावेळीसुद्धा तो पेशंट कोमामध्ये जातो. इतके प्रयत्न करून ही पेशंट कोमामध्ये का गेला? याचे उत्तर कोणाकडेही नसते. विशेष म्हणजे अगदी किरकोळ अश्‍या आजारातून पेशंट कोमामध्ये जातो तो कायमचाच. या सगळ्या घटना त्या हुशार धाडसी शिकाऊ डॉक्‍टरला फारच अस्वस्थ करू लागतात. या सगळ्या गोष्टींमागे काही दुष्ट शक्ती तर नाही ना असा संशय तिला येऊ लागतो. मग ती या सगळ्याचा शोध घेण्याचे ठरवते. इथून पुढे कथेला वेगवेगळी वळणं लागत जातात. पहिला शोध तिला असा लागतो की हे किरकोळ आजारी असलेल्या तरुण पेशंटच्या बाबतीतच हे घडते. दुसरे असे की, सगळे कोमा पेशंट आठ क्रमांकाच्या खोलीतच कोमामध्ये जातात. या सगळ्या मागे कोण आहे आणि असे का होते? याचा ती खूप कसोशीने शोध घेते. यामध्ये तिच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला होतो. तरी ती शेवटपर्यंत याचा शोध घेतच राहते. आणि कथेच्या शेवटी तिलासुद्धा आठ क्रमांकाच्या रूममधे शस्त्रक्रियेसाठी घेऊन जातात. तिचा शोध कसा पूर्ण होतो. तिच्या हाती कोणती माहिती लागते. त्या शूर मुलीने लावलेला धक्कादायक शोध नक्की वाचा. शेवटपर्यंत ही कथा उत्सुकता वाढवणारी आहेच पण मनाला सुन्न करणारी ही आहे..
डोळसपणे जगाकडे बघा हा मोलाचा संदेश हे पुस्तक आपल्याला देऊन जाते…

– मनिषा संदीप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)