पिटबूल, जर्मन शेफर्ड, रॉट व्हिलर, पामेलियन जातीचे श्वान यांनाही पसंती
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – गेले चार दिवस येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर सुरू असलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनात मंगळवारी श्वान प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कृषि प्रदर्शनात पशु-पक्षी व श्वान प्रदर्शन हे अबालवृद्धांचे लक्ष वेधतात. त्यामुळे या प्रदर्शनाला नेहमीच गर्दी झालेली दिसते. संपूर्ण राज्यातून देशी व परदेशी जातीचे श्वान या स्पर्धेसाठी येथे आणले जात असल्याने ते नेहमीच आकर्षण ठरले आहेत. मंगळवारी झालेल्या प्रदर्शनात ग्रेट डेन व बॉक्सर हे चॅम्पियन ऑफ दि शो ठरले. त्याचबरोबर प्रथमेश मोघे यांचा पिटबुल जातीच्या श्वानानेही सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. जर्मन शेफर्ड, रॉट व्हिलर, पामेलियन यांनीही उपस्थितांची मने जिंकली.
स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक प्रदर्शनाचे यंदाचे हे पंधरावे वर्ष आहे. शेती उत्पन्न बाजार समिती व शासनाचा कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीच्या कृषि प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रदर्शनांतर्गत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यावर भर दिला गेला आहे. शेतऱ्यांकडूनही या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रदर्शनांतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध स्पर्धांचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते. त्यामध्ये ऊस पीक, फळे व फुले, पालेभाज्या आदी स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धांबरोबर पशु-पक्षी व श्वान स्पर्धेचेही नित्यनेमाने आयोजन केले जात असून त्याला सर्वाधिक पसंती मिळते. श्वान प्रदर्शन हेच कृषि प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरतात.
यावर्षीच्या कृषि प्रदर्शनामध्ये प्रथमेश मोघे यांच्या पिटबुल जातीच्या गब्बर श्वानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या श्वानाच्या जबडयात प्रचंड ताकद असल्याचे मोघे यांनी सांगितले. हा श्वान एखादी वस्तू पकडली की तो सहजासहजी सोडत नाही त्यामुळे या श्वानाला मोठी मागणी असल्याचे ते म्हणाले. तसेच या श्वानासाठी जास्त पैसे मोजावे लागतात असेही ते म्हणाले.
त्याबरोबरच प्रितेश पवार यांच्या रॉट व्हिलर जातीचा वॉकी, राकेश झिमरे यांच्या पिटबुल, ओंकार बाबर यांचा ग्रेहाऊंड जातीचा रोमन, अविनाश बाबर यांचा पामेलियन जातीचा टफी, योगेश थोरात यांचा जर्मन शेफर्ड जातीचा पिल्या, शुभम कोरडे यांचा जर्मन शेफर्ड जातीची स्विटी, ओकार मोहिते यांचा पग जातीचा स्पार्क, विशाल भोपते यांचा ग्रेटडेन जातीचा सायबराव, विलास एलोंडे यांचा सायबेरीयन हस्की जातीचा रॉकी आदी श्वानांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्वान पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. ग्रेट डेन व बॉक्सर
प्रदर्शनात 147 श्वानांचा सहभाग
स्व. यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनस्थळी मंगळवारी घेण्यात आलेल्या श्वान स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध जातीचे एकूण 147 श्वान सहभागी झाले होते. त्यामुळे आयोजकांना स्पर्धेसाठी अकरा गट करावे लागले. ग्रेट टेन व बॉक्सर या गटात एकच श्वान सहभागी झाले होते. हेच दो श्वान हे चॅम्पियन ऑफ दि शो ठरले.
विविध जातीच्या श्वानाचे निकाल पुढीलप्रमाणे पश्मी – प्रज्वल जगदाळे (नांदगाव- प्रथम), निकीता जगदाळे (नांदगाव -द्वितीय), रमेश घाडगे (विटा- तृतीय) तर संदीप थोरात (ओंड- उत्तेजनार्थ). पामेरियन – दत्तात्रय रोकडे (नेर्ले- प्रथम), अविनाश बाबर (जखिणवाडी- द्वितीय), वेदांत भोसले (मानेगाव- तृतीय). डॉबरमॅन – सुर्या पेंटस् (कराड- प्रथम), योगेंद्र यादव (नारायणवाडी-द्वितीय), जगन्नाथ कांबळे (ओगलेवाडी- तृतीय), विजय कांबळे (कराडइ उत्तेजनार्थ). लॅब्रोडॉर – अमित शिंदे (कराड- प्रथम), धनंजय मोरे (सुर्ली- द्वितीय), लखन कांबळे (कराड- तृतीय), ग्रेट डेन – सचिन पवार (गोटे -प्रथम), बॉक्सर – रोहन पाटील (कराड- प्रथम),
युटिलीटी – अरविंद कांबळे (वाई -प्रथम), अभिषेक पाटील (कराड- द्वितीय), श्रेयश भागवत (उंब्रज- तृतीय), प्रकाश काळे (मालदन- चतुर्थ). युटिलिटी – विकास देसाई (आणे -प्रथम), भूषण खैरमोडे (गोटे -द्वितीय), संभाजी इंगवले (कराड- तृतीय), ओम माळी (मुंढे ) व शिवम जानुगडे (कराड- उत्तेजनार्थ). कारवान – रोहित निकम (वरे -प्रथम), रामचंद्र बामोलकर (बामोलकरवाडी- द्वितीय), रोहन ढाणे (बोरगांव- तृतीय), प्रणय चिमण (धावडेवाडी -उत्तेजनार्थ). रॉट व्हिलटर जगन्नाथ कांबळे (ओगलेवाडी -प्रथम), रोहित शेजवळ (पाली- द्वितीय), ओंकार जाधव (मलकापूर- तृतीय), मंदार कन्हाळे (ओगलेवाडी- उत्तेजनार्थ). जर्मन शेफर्ड – प्रथमेश हबळे (सातारा- प्रथम), रत्नदिप शिंदे (कराड- द्वितीय), ओंकार काशिद (कराड- तृतीय), प्रसाद सुर्यवंशी (कराड- उत्तेजनार्थ). ग्रेहॉंड – ओंकार बाबर (जखिणवाडी- प्रथम), संकेत कांबळे (राजमाची- द्वितीय), विलास कांबळे (सुपने- तृतीय), दिपक पाटील (विऊर -उत्तेजनार्थ) क्रमांक मिळवला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा